News

नूतन संस्थेचे दोन संघ उपविजयीराज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा दि. ५ ते ७ डिंसे. रोजी सांगली येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेस सेलू नूतन शिक्षण संस्थेचे १९ वर्ष मुले / तर १७ वर्ष मुले संघ राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजयी ठरले.

या दोन्ही संघानी औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करत अंतिम फेरी गाठली. १७ वर्ष मुले संघानी, कोल्हापूर, नाशिक विभागाचा २:१ सेट मध्ये पराभव कऱन अंतिम फेरी गाठून उपविजेता ठरला. १७ वर्ष मुले संघात :- चि.ऋषिकेश माने,निलेश माळवे, वृषाक चिचोलीकर, तन्मय चोपडे, अजय गोंडगे, प्रथमेश सोनवणे, हे खेळाडु दुसरा क्रंमाक चे मानकरी ठरले. तर १९ वर्ष मुले, संघाने औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करत, कोल्हापुर व नाशिक विभाग चा २:० सेट मध्ये पराभव करत अंतिम फेरीत पुणे विभाग सोबत २:० ने पराभुत होऊन उपविजेता ठरला. या संघात सिध्दांत लिपने, सुरज लिपने, चंद्रशेखर ताठे, शेख यासर, बेग अजझर,यांनी उत्कृष्ट कामगीरी करत दुसरा क्रंमाक प्राप्त केला.

या खेळाडूस मार्गदर्शन डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे, सतिश नावाडे, प्रा. नागेश कान्हेकर याचे लाभले. यशस्वी खेळाडूस अभिनंदन कऱन शुभेच्छा संस्था अध्यक्ष डॉ. एस.एम लोया, उपाध्यक्ष अॅड वंसतराव खारकर, सचिव द.रा कुलकर्णी, सहसचिव डि.के.देशपांडे, डॉ.व्ही.के कोठेकर, प्रार्चाय डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक नागेश देशपांडे, नरेद्र पाटील, अनिल कुलकर्णी, पंजाब खडसे, जिल्हा क्रीडा धिकारी सी.व्ही साखरे,नंदु बंगाळे, सी.टी. नावाडे, के.के.कदम, डॉ.एल.एच.काळे