News

चंद्रशेखर ताठेला सुवर्ण पदक !राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत यश


भारतीय खेळ महासंघ व वरंगळ महासंघ यांच्या वतीने तेलंगणा येथे नुकत्याच शालेय राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नूतन महाविद्यालयाचे खेळाडू चंद्रशेखर पांडुरंग ताठे याने सुवर्णपद प्राप्त केले. तेलंगणा येथे ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धाखेळविण्यात आल्या. महाराष्ट्र संघाकडून खेळणार्‍या चंद्रशेखर ताठे याने दिल्ली, कर्नाटक राज्याचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले. या खेळाडुस प्रा. नागेश कान्हेकर, सतीश नावाडे यांचे मार्गदर्शन लाभले. ताठे यांनी आतापर्यंत ४ राज्य टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी करीत पदके प्राप्त केली आहेत.्या स्पर्धेत क्रीडा शिक्षक गणेश माळवे यांची तांत्रिक समिती चेअरमनपदी भारतीय महासंघाने नियुक्ती केली आहे. त्यांनी आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पंचम्हणून काम पाहिले.