News

मागे वळून पाहतानाप्राचार्य द. रा. कुलकर्णी यांचे आत्मकथन

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य द. रा. कुलकर्णी यांच्या "मागे वळून पाहताना" या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन 'असोसिएशन ऑफ कॉलेज एंड युनिवर्सिटी सुपर एन्युएटेड टीचर्स" अर्थात सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या संघटनेच्या अधिवेशनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. ए. वाहूळ यांच्या हस्ते झाले.

डॉ. एम. ए. वाहूळ यांनी द. रा. कुलकर्णी यांनी या आत्मकथनाच्या निमित्ताने माझ्या जीवनातील गेल्या सहा दशकातील शैक्षणिक, सामाजिक कार्याची नोंद घेण्याचा अल्पसा प्रयत्न मी या आत्मकथनातून करण्याचा प्रयत्न केला, असे सांगून नव्या पिढीला याचा थोडा फार उपयोग झाल्यास मला आत्मिक समाधान लाभेल असा विश्व व्यक्त केला.

या पुस्तकास पत्रकार डॉ. आसाराम लोमटे यांची प्रस्तावना आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेचे राज्यातील पदाधिकारी, तसेच साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी, डॉ. प्रभाकर देव, प्रा. दिनकर बोराळकर, प्राचार्य बी. बी. देशपांडे, डॉ. व्ही. के. कोठेकर, प्रा. प्रभाकर रावते, मयुर प्रिंटर्सचे सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.


आदरणीय प्राचार्य द.रा.कुलकर्णी सर यांचे आत्मचरीत्र. नविन शिक्षकानां प्रेरणा व मार्गदर्शक आसनार्या या ग्रंथाची संकल्पना,मांडनी, रचना व मुद्रणा ची संपुर्ण जवाबदारी मयुर प्रिंटर्स नांदेड, (मुळचे सेलूचेच) श्री सतीष कुलकर्णी यानी सुरेख हाताळली आहे.ह्या मुळे ग्रंथ वाचकाला एकदम आकर्षीत करतो


आदरणीय प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार आज जाहीर झाला.विद्यापीठाने शिक्षणक्षेत्रातील एका तपस्वी व्यक्तीला हा बहूमान दिल्याने या पुरस्काराची शान निश्चितच उंचावेल.गुणवत्ता आणि उपक्रमशीलतेसाठी मराठवाड्यातच नव्हे तर संबंध महाराष्टात नामांकित असलेल्या या महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी २५ वर्षे यशस्वीरित्या सांभाळले. प्राचार्य पदावर असतांना त्यांनी स्वतःची एक निर्दोष आणि परिपूर्ण प्रशासनप्रणाली घडवली. नियम आणि मूल्यांशी तडजोड न करता सार्वजनिक जीवनात कसे कार्यरत रहावे याचा अदर्श वस्तूपाठ त्यांनी समाजासमोर ठेवला. सेलू शहरातील प्रत्येक विधायक चळवळीत त्यांनी पुर्णपणे समरसतेने सहभाग नोंदवला.अज वयाच्या ८२व्या वर्षी संस्थेच्या चिटणीसपदाची धुरा सांभाळत असतांना त्यांचा उत्साह कमी झाला आहे असे अजिबात जाणवत नाही.ही उर्जा,ही धडपड अजही तरूणांना लाजवेल अशीच अहे. ही प्रेरणा यापुढेही अक्षय वृध्दिंगत होवो हीच या निमित्ताने अपेक्षा

-सतीश कुलकर्णी