News

रंगभरण स्पर्धा 2018हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

कै.श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंती निमित्य आयोजित रंगभरण स्पर्धा

दलितमित्र कै.श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंती निमित्य आयोजित रंगभरण स्पर्धेला सेलू शहरातील 1100 च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

गुरुवार दि. 13 डिसेंबर रोजी नूतन विद्यालयाच्या प्रार्थना मैदानात संपन्न झालेल्या स्पर्धेच्या उद् घाटना प्रसंगी अध्यक्ष म्हणूण नूतन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांची उपस्थिती होती.तर व्यासपिठावर  संस्थेचे सचिव डि.के.देशपांडे, प्राचार्य डि.आर.कुलकर्णी सहसचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, जयप्रकाशजी बिहानी, कार्यकारणी सदस्य नंदकिशोर बाहेती, नारायण देउळगावकर, शोभा चाटे, सुरेश रणखांबे, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेसाठी सेलू शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय,यासेर उर्दू हायस्कूल,प्रिन्स अकॅडमी,ज्ञानतीर्थ विद्यालय,नूतन कन्या शाळा,कस्तूरबा गांधी बालीका विद्यालय,नूतन इंग्लिश स्कूल,नूतन प्राथमिक शाळा सह अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल कुलकर्णी यांनी केले.स्पर्धेच्या वाटचालीची माहिती चित्रकला विभाग प्रमुख किशोर कटारे यांनी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काशिनाथ पल्लेवार यांनी केले तर आभार फुलसिंग गावित यांनी मानले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख किशोर कटारे, फुलसिंग गावित, आर.एन.सोन्नेकर, अतुल पाटील, आरती कदम, सुर्यकला सुर्यवंशी, वर्षा कदम, सुरेश हिवाळे, सौ.गांजापूरकर, विरेश कडगे, रोडगे सर,गजानन मुळी, सह सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.