News

'जीवनसाधना गौरव'श्री. द. रा. कुलकर्णी यांना पुरस्कार

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा, शिक्षण व संशोधन, समाजिक कार्य, कृषी, उद्योग व व्यापार आदी क्षेत्रांपैकी एखाद्या क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय योगदान देणार्‍या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील व्यक्तीला 'जीवनसाधना गौरव' पुरस्कार देण्यात येतो.

यावर्षी (2015) हा पुरस्कार नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलूचे विद्यमान सचिव प्राचार्य श्री. द. रा. कुलकर्णी यांना डॉ पंडित विद्यासागर, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण विद्यापीठ वर्धापणदिनी १८ सप्टेंबर रोजी विद्यापीठ अधिसभा सभागृहात करण्यात आले होते.