News

विज्ञान प्रदर्शन 2016४२ वे तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

बाल वैज्ञानिकांनी शाळेचा नावलौकीक वाढवावा - राजेंद्र लहाने

सेलू : येथील नूतन विद्यालयात बुधवार ता. ०७ डिसेंबर रोजी राज्य विज्ञान संस्था नागपूर, शिक्षण विभाग परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने ४२ वे तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य व लोकशिक्षण प्रदर्शन संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्रकाका लहाने यांच्या हस्ते झाले.त्या प्रसंगी ते म्हणाले की, "बाल वैज्ञानिकांनी आपल्या अविष्कारातून आपल्या शाळेचा नाव लौकीक वाढवावा. विद्यार्थी विज्ञानाकडे वळावा, त्याच्यात विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि भावी वैज्ञानिक घडावेत हाच हेतू या विज्ञान प्रदर्शनाचा असतो" असेही राजेंद्रकाका लहाने म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते. या तालूकास्तरी विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात १३, माध्यमिक गटात १३, अशी विद्यार्थ्यांची २६ उपक्रम तर शिक्षकांच्या प्राथमिक गटात ४, माध्यमिक गटात ६ तर परिचर या गटात ०१ अशी तेरा शाळांची वैज्ञानिक उपक्रम या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी केले. सुञसंचालन संतोष पाटील यांनी केले. तर उज्वला लड्डा यांनी आभार मानले विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक पंजाब खडसे, सुरेश रणखांबे यांच्या मार्गदर्शनात विविध समित्यांनी पुढाकार घेतला.

सेलू तालुका विज्ञान प्रदर्शन समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. जयप्रकाश बिहाणी यांचा सत्कार करताना प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. पाटील, अनिल कुलकर्णी, पंजाब खडसे, सुरेश राणखांबे, प्रा. वसंत पांचाळ,प्रा. चव्हाण.
सेलू : येथील नूतन विद्यालयात आयोजित तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उद्घाटनपर भाषण करतांना जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र लहाने