News

रंगभरण स्पर्धा

येथील नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष तथा नूतन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलित मित्र कै. श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त १७ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा पार पडल्या.

स्पर्धेचे उद्घाटन नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांच्या हस्ते करण्यात आले. उपाध्यक्ष अँड. वसंतराव खारकर, सहसचिव डी. के. देशपांडे, मुख्याध्यापक नागेश देशपांडे, नरेंद्र पाटील, अनिल कुलकर्णी, पंजाब खडसे आदींची उपस्थिती होती. भांगडिया यांचे कार्य येणार्‍या पिढीला माहिती व्हावे वत्यांचे स्मरण व्हावे, या हेतूने ८ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन केले जाते.

१७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळांमधील ८00 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे सर्व विद्यार्थी रंगभरण्यामध्ये दंग होते. स्पर्धेचे संयोजन करण्यासाठी कला शिक्षक राम कटारे, फुलसिंग गावीत, भगवान देवकते, अतुल पाटील, सुरेश हिवाळे, मुळी, धापसे आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले