News

Inter University Tournament

खो-खो ला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा - कुलगुरु, डॉ. पंडित विद्यासागर

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे शानदार उद्घाटन

येथील नूतन महाविद्यालय,सेलू व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचे शानदार उद्घाटन मंगळवार ता. २ जाने. २०१८ रोजी कै. श्रीरामजी भांगडीया क्रीडा नगरी, नूतन महाविद्यालय मैदानात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते दिप आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून तसेच क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहन करून झाले पुढे ते आपल्या मनोगतात म्हणाले की, भारतात खेळाला खुप मोठे महत्व प्राप्त झाले असून इतर खेळांप्रमाणेच खो खो ला देखिल आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे व येथे खेळणाय्रा खेळाडूंना भविष्यात आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळण्याची संधी मिळावी अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विजयरावजी भांबळे, अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, माणसाला जीवनात खेळ आवश्यक असेन या स्पर्धेमुळे खेळाप्रती सकारात्मक वातावरण निर्माण होईल याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष मा. विनोदराव बोराडे, अँड. बाळासाहेब जामकर,उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, क्रीडा संचालक तथा आयोजन समिती सचिव डॉ. मनोज रेड्डी, उपाध्यक्ष खो-खो संघटना प्रदिप देशमुख, सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, संस्थाध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव श्री. डी. के. देशपांडे, सहसचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, श्री. जयप्रकाश बिहाणी, प्रा. यु. डी. इंगळे, श्री. राजेश्वर पाटील, श्री. हेमंतराव आडळकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, उपप्राचार्य यादव गायकवाड, प्रा.डॉ. माधव शेजुळ, प्रा. के. के. कदम, प्रा. नागेश कान्हेकर, श्री. डी. डी. सोन्नेकर , कु. रिता मसुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘खेल खेलेंगे’ या नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गिताने आणि संतोष धुमाळ यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राची लोकधाराने वातावरण भारावून टाकले. स्वागतपर भाषण नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी तर विद्यापिठाच्यावतीने डॉ. मनोज रेड्डी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. मोहन पाटील, प्रा. अर्चना पत्की, प्रा. गुलाब शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. वाय. आर. गायकवाड यांनी केले

श्री. अशोक लिंबेकर सरानी तयार केलेली कार्यक्रम पत्रिका

For more photos : CLICK HERE