News

NCERT Training 2019श्री किरण देशपांडे यांचा सहभाग

येथील नूतन विद्यालयातील इंग्रजी विषय शिक्षक किरण कांतराव देशपांडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दिल्ली (NCERT)ची विभागीय संस्था असलेल्या Regional Institute of Education, भोपाळ, मध्य प्रदेश येथे Training Programme On Communication Skills For Key Resource Person At Secondary Level हा पाच दिवसीय(१४.०१.२०१९ ते १८.०१.२०१९) प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील इंग्रजी विषय शिकविणाऱ्या एका माध्यमिक शिक्षकाची निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणाविषयीचे पत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथील संचालक डॉ सुनील मगर यांनी काढले होते. या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, चिटणीस डी. के. देशपांडे, सहचिटणिस डॉ. वि. ख. कोठेकर, जयप्रकाशजी बिहानी, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे,  मारोती सुर्वे, रामकिशन मखमले यांनी किरण देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे.