News

शिष्यवृत्ती परीक्षा 2017

शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत, तर चि. कुलकर्णी सौरभ श्रीनिवास हा विद्यार्थी राज्यातून १६ वा आला आहे.

पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी ) ३४ विद्यार्थी पात्र झाले आहेत. तर ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षेत १५ विद्यार्थी 
 पात्र ठरले असून १ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाला.

  1. चि. कुलकर्णी सौरभ श्रीनिवास 266 गुण जिल्हा 3 रा राज्यात 16 वा
  2. कु. कांदळे शालिनी मनोज 252 गुण जिल्हा 16 वी
  3. चि. लटपटे ओंकार बबनराव 244 जिल्हा 23 वा
  4. चि. पाटवकर परेश दगडू 242 जिल्हा 25 वा
  5. कु. शेळके निकीता नानाभाऊ 234 जिल्हा 32 वी
  6. चि. कणसे लक्ष्मण नामदेवराव 226 जिल्हा 50 वा
  7. चि. भोगावकर सोहम संतोष 216 जिल्हा 74 वा

 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष  ऍड. वसंतराव खारकर, सचिव  श्री. डी. के.  देशपांडे, सहसचिव श्री. व्ही. के. कोठेकर व जयप्रकाश बिहणी, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सीतारामजी मंत्री, शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. व्ही. वाघमारे, उपमुख्याध्यापक श्री अनिल कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री रणखांबे, व श्री अशोक गाजरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख श्री सुनील तोडकर, अरविंद आंबेकर, अर्चना कुलकर्णी, शैलजा कउतकर, शिल्पा बर्डे यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख श्री बन्सीलाल पद्मावत, कुशल कडे, आरती कदम, गजानन मुळी, संभाजी रोडगे, संतोष मलसटवाड, यांनी मार्गदर्शन केले.

To view photos click here...