Headmistress
नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित असलेल्या शाळेचे श्रीमती ल. ला. रा. नूतन कन्या प्रशाला हे नाव. मुलीच्या शिक्षणाचे एक स्वतंत्र असे दालन, अशा अनेक विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या मनातील एक आदर्श संकल्पना. आज संस्थेचा आपला अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे.
शाळेची स्थापना १ ऑगस्ट १९७३ ची. मुलीना शिक्षणाची स्वतंत्र संधी त्या द्वारे त्यांच्या जीवन शिक्षणाची, विकासाची संद्ठी अशी सुरुवात. "यत्र नायस्त पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवत: |" हे शाळेचे ब्रीद. स्वामी रामानंद तीर्थ यांची कल्पना आणि श्रीरामजी भांगडिया यांच्या सारख्या शिक्षणप्रेमी व्यक्तीद्वारे फुललेल्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे हे छोटेसे रोपटे. लालजी रामजी यांच्या सारख्या दानशूर नेतृत्वामुळे प्रशालेचे नामकरण श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला असे झाले आणि एका स्त्री द्वारे दुस-या स्त्रीला शिक्षणाची द्वारे खुली झाली आणि इतिहासातील सुवर्णपान उघडले गेले.
स्त्री शिक्षण, स्त्री विकास हाच प्रशालेचा मूलाधार. विद्यार्थिनी हाच केंद्रबिंदू मनात सतत प्रयत्नशील शिक्षकांनी प्रगतीचे शिखर उंचावत नेले. या विद्यार्थीनीना मिळणारे यश व त्यातूनच शाळेची राज्य व राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली. त्यामुळेच आज "नूतन कन्या " च्या विद्यार्थिनी स्वतःच्या कर्तृत्वाने प्रशालेचे नाव दैदिप्यमान करीत आहेत. आज प्रशालेच्या भव्य इमारतीत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. गरजेनुसार, संख्येनुसार शाळेचा विस्तार होत आहे. आणि त्याच गरजेनुसार प्रशालेत ११ वी व १२ वी या नवीन इयत्तांचा प्रारंभ झाला. कला आणि वाणिज्य शाखांचे उच्च माध्यमिक विभाग प्रशालेत सुरु झाले. श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल (बामनीवाले) या दानशूर महिलेच्या देणगी प्रित्यर्थ्य उ. मा. विभागाचे नामकरण श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग असे झाले.
पुढील काळातील बदलानुसार शाळा योग्य ते नवे, नित्य बदल करीत अनेक विभागासह तंत्रज्ञानाचा वापर सुसज्ज होत आहे. आज प्रशालेच्या भव्य नव्या इमारतीसह सुसज्ज अनेक नव्या योजनांची आखणी संस्थेच्या मार्गदर्शनाने आखत आहे. माजी विद्यार्थिनी आणि शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या सहभागाद्वारे या पूर्णत्वास जातीलच. नूतन कन्या प्रशाला आपली यशाची २५ वर्षे पूर्ण करून संस्थेच्या अमृत महोत्सवात आपल्या नवनवीन योजनासह यशाचा आलेख रुंदावण्यास तयार आहे.
सर्वाना खूप खूप शुभेच्छा !
सौ. चाटे एस. एम.
मुख्याध्यापिका, नूतन कन्या प्रशाला, सेलू