स्काउट गाईड विभाग अहवाल

स्काउट गाईड विभाग अहवाल

नूतन विद्यालयात स्काउट गाईड विभाग कर्यरत असून जांबोरी ,मेळावे व आयोजित कॅम्पस मध्ये आमच्या स्काउट गाईडचा सहभाग असतो.

आमच्या स्काउट संघाने भोपाल ,रायपुर ,मुंबई ,चेन्नई , दिल्ली व हैद्राबाद येथे आयोजित जांबोरीत सहभाग नोंदविला असून नाशिक, पुणे, लातूर येथे आयोजित राज्य मेळाव्यात स्काउट संघाने सहभाग नोंदविला तसॆच राष्ट्रीय एकात्मता कॅम्प गदपुरी (हरियाना) येथे महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

प्रशालेतील स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यात दरवर्षी सहभाग असतो. शिवाय शाळेच्या स्थानिक स्काउट गाईड मेळावा आयोजित करण्यात येतो.

प्रशालेत ४२ स्काउट व ६ गाईड राज्य पुरस्कार प्राप्त असून ०४ राष्ट्रपती अवार्ड उतीर्ण आहेत. त्यांचे नावे अनुक्रमे

  • चि. देशपांडे सुमेध नागेशराव .........राष्ट्रपती आवार्ड २०११
  • पाटील शुभम सुरेशराव..................राष्ट्रपती आवार्ड २०११
  • चौधरी लक्ष्मीकांत सुधीरराव .........राष्ट्रपती आवार्ड २०११
  • जामदार विजय तुळसीदास............राष्ट्रपती आवार्ड २०११

प्रशालेत ६ स्काउट शिक्षक व ४ गाईड कॅप्टन असून श्री बारडकर यांना स्काउट शिक्षकाचा राज्यपुरस्कार २०१३ ला प्राप्त झाला आहे.