प्रयोगशाळा

प्रयोगशाळा

प्रशालेत अद्यावत प्रयोगशाळा आहे. विज्ञान पेटी ,विविध यंत्र, साहित्य, विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रयोग करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. शासनाचे मानव विकास साहित्य उपलब्ध आहे. शासकीय विज्ञान प्रदर्शनात तालुका, जिल्हा व राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रमांक प्राप्त केला आहे.

 

विज्ञान प्रयोगशाळा

नूतन विद्यालय सेलू या शाळेला सुसज्ज प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळा प्रमुख म्हणून श्री. इंगोले एंन.एम.आहेत. व प्रयोगशाळा साहयक म्हणून श्री पुरी एम.एम. काम पाहतात.शाळेत इ. ५ वी. ते १० वी. च्या विद्यार्थ्यांना नियमित प्रयोग दाखवण्यात येतात. बऱ्याच वेळा शाळेचा प्रयोग तालुका , जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गेलेले आहे. विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टीकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागावी या साठी सर्व विज्ञान शिक्षक मार्गदर्शन करतात.

या वर्षी 'स्वनिर्मित प्रयोगशाळा' शॆ. साहित्य निर्मिती करून तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात प्रथम व राज्यातील ३९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन धामणगाव रेल्वे जि. अमरावती येथे २७-०१-२०१४ ते ३१-०१-२०१४ येथे सहभाग घेऊन यशस्वी केले.

संगणक प्रयोगशाळा

प्रशालेत अद्यावत संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली. आधुनिक युगात संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्यासाठी वेळापत्रकात तासिकेचे नियोजन करण्यात आले. नियमित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कार्य दिले जाते. मानव विकास प्रकल्प अंतर्गत ओव्हर हेड प्रोजेक्टरद्वारे विविध साहित्य विद्यार्थ्यांना दाखविले जाते.