सांस्कृतिक विभाग

सांस्कृतिक विभाग

आजचा विद्यार्थी उद्याचा क्रियाशील, कर्तृत्ववान नागरिक तयार व्हावा म्हणून हा विद्यार्थी समता, बंधुता आणि एकता जपणारा सुज्ञ, चारित्र्यसंपन्न व स्वदेशाभिमानी बनला पाहिजे हॆच ध्येय बाळगून प्रशालेत सांस्कृतिक विभाग कार्यरत असतो.

  • या विभागाद्वारे संपूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची मने सुसंस्कारित व्हावी या जाणीवेतून संपूर्ण वर्षभर महान संत, नेते, समाजसुधारक इ. महान सत्पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साज-या केल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाटक, समूहगीत स्पर्धा, समूहनृत्य इ. आयोजित केल्या जातात.

  • राज्यबालनाटय स्पर्धेत - 'आदिंबाच्या  बेटावर' हे नाटक राज्यस्तरावर बक्षीसपात्र ठरले. यात नेपथ्य, वेशभूषा आणि सहभागी कलाकार -चि. श्रेयस रवींद्र कुलकर्णी व कु. प्राजक्ता टेहरे यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. तसेच 'सिद्राम सुडोकू' या नाटकातील कलाकार चि. आदित्य बाबासाहेब थोरे यास उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले.

  • या वर्षी 'घटाघटाचे रूप आगळे' हे नाटक देखील राज्य बालनाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले.
  • 'जागर जाणिवांचा'  हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले जयंती निमित्य घेण्यात आला. त्यात जनजागरण फेरी काढण्यात आली. या वेळी सदर झालेल्या पथनाट्य व वेशभूषेस अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळाले.

  • सुरभी युवक महोत्सव २०१३ अंतर्गत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली हा देखावा सादर करण्यात आला त्यास प्रथम बक्षी मिळाले.