मोफत पास योजना अहवाल

मोफत पास योजना अहवाल

मुलींसाठी आहिल्याबाई होळकर मोफत पास योजना या अंतर्गत दरवर्षी ५० ते ६० मुली ग्रामीण भागातून येणे -जाणे करतात. शालेय शिक्षणासाठी शासनातर्फे  बसची व्यवस्था आहे.  ग्रामीण भागामध्ये फक्त प्राथमिक शिक्षणाची सोय असते या योजनेमुळे मुलीना माध्यमिक शिक्षण घेणे शक्य झाले आहे.

२०१३-१४ वर्षापासून इ. ८ वी व १० वी साठी शासनाने मानव विकास योजने अंतर्गत मुलींसाठी स्वतंत्र बसची सोय केलेली आहे. यामुळे मुली सुरक्षितपणे ग्रामीण भागातून येणे-जाणे करू शकतात.

या वर्षी आपल्या प्रशालेतील इ. ५ वी ते ७ वी च्या एकूण १६ मुली आहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजने अंतर्गत ग्रामीण भागातून येणे-जाणे करतात. तसेच इ. ८ वी ते १० वी च्या एकूण २२ मुली मानवविकास योजने अंतर्गत येणे-जाणे करतात एकूण ३८ मुले या योजनेचा या वर्षी लाभ घॆत आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील मुलीना या योजनेचा लाभ होतो.