स्वयंशासन दिन

प्रशालेत इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाचा अनुभव यावा, त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावे. तसेच शालेय पूरक हालचाली उपक्रम निर्माण होण्यासाठी २००९ पासून स्वयंशासन दिन (school day) संपन्न होत आहे. यात इ. १० वीतील सर्व तुकड्यातील विद्यार्थी सहभागी होतात.

४२ तुकड्यात प्रत्येकी एक तास नुसार ४ तासिकेचे नियोजन करण्यात येते. विद्यार्थ्यातून मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, दोन शिक्षक असे पद निर्माण करण्यात येतात. जवळपास १५० विद्यार्थी शिक्षकांची भूमिका निभावतात. तर उर्वरित विद्यार्थ्यांना इतर कामात सहभागी करून घेतले जातात. या स्वंयशासन दिनामुळे सहभागी झालेले विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी मिळते. या एका दिवसाच्या कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनात नेहमीची एक आठवण राहते.

त्याच बरोबर आपल्या सहकारी बालमित्रांना शिकवल्याचा जो अनुभव मिळतो त्यातून त्यांना बरेच काही शिकायला मिळते. यामुळे स्वयंशासन दिन विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय झाला असून विद्यार्थी स्वयंशासन दिनाची आवर्जून वाट पाहतात