चित्रकला विभाग

चित्रकला विभाग २०१३-१४

महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय चित्रकला परीक्षा व स्पर्धा शाळेमध्ये नित्यनियमाने घेतल्या जातात. या स्पर्धा व परीक्षेसाठी  शाळेतून बहुसंख्येने विद्यार्थी भाग घेतात.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद विभागाकडून घेण्यात आलेल्या शासकीय बालचित्रकला स्पर्धा २०१३ या स्पर्धेसाठी आपल्या प्रशालेतून एकूण १४५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ५ वी ते ७ वी ७७ तर ८ वी ते १० वी ६६ विद्यार्थी.

शासकीय रेखाकला परीक्षा सप्टेंबर २०१३ या परीक्षेसाठी एलिमेट्री ४८ विद्यार्थी तर इंटरमेजिएट ३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

निकाल

  • एलिमेट्री ग्रॆड परीक्षा : ७८.४%
  • इंटरमेजिएट ग्रॆड परीक्षा : ९०.००%

इंटरमेजिएट या परीक्षेत कु. चटलोड नेहा रामलू हिला 'A' ग्रॆड तर चि. गायकवाड गणेश सुरेशराव या विद्यार्थ्याला 'B' ग्रॆड मिळाला.

सामाजिक वनीकरण विभागातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ५ वी ते ७ वी या गटात चि. भांडवले प्रताप प्रभाकर या विद्यार्थ्याला जिल्हास्तरावर तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

आझाद एज्युकेशन एंड वॆल्फेयर सोसायटी द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय आझाद चित्रकला स्पर्धा २०१४ राजीव गांधी हायस्कूल, ताडबोरगाव या ठिकाणी संपन्न झाली या स्पर्धेत आपल्या प्रशालेतून एकूण १० विद्यार्थी सहभागी झाले होते.

  • गट ४ थी ते ७ वी : ०९ विद्यार्थी
  • गट ८ वी ते १० वी : ०१ विद्यार्थी
  • गट ४ ते ७ वी या गटातून चि. आराख शुभम सुदेश या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक मिळविले.
  • नवनीत पब्लिकेशन द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धा गट ४ थी ते ६ वी १६ विद्यार्थी गट ७ वी ते १० वी १९ विद्यार्थी सहभागी झाले होते.

शालेय पातळीवरील बक्षीसपात्र विद्यार्थी (४ थी ते ६ वी)

  • वडकर पार्थ आनंद : प्रथम क्रमांक
  • लांडे अमर विठ्ठलराव : द्वितीय क्रमांक
  • साबळे सोहम दीपक : तृतीय क्रमांक

शालेय पातळीवरील बक्षीसपात्र विद्यार्थी (७ वी ते १० वी)

  • म्हस्के शैलेश शिवाजीराव :प्रथम क्रमांक
  • कारके भाग्यश्री राजाराम : द्वितीय क्रमांक
  • जोशी तुषार गणेशराव : तृतीय क्रमांक 

नूतन विद्यालय सेलू चित्रकला विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ,नूतन विद्यालय शिक्षण संस्था अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व कॆ. दलित मित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंती निमित्त रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १०२१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

नूतन विद्यालय शिक्षण संस्था अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली. गट ८ वी ते १० वी व गट ११ वी ते १२ वी या गटात संपन्न झाली

नूतन इंग्लिश स्कूल सेलू , मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ८ वी बालचित्रकला स्पर्धा दि १७ सप्टेंबर २०१३ रुजी संपन्न झाली यात प्रशालेतून एकूण १० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत चि. आराख शुभम सुदेश या विद्यार्थ्याने प्रथम पारितोषिक मिळविले.