रंग भरण स्पर्धाश्रीरामजी भांगडिया जयंती निमित्त

नूतन विद्यालयाच्या प्रार्थना मैदानात दलितमित्र तथा सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष, नूतन विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष (कै.) श्रीरामजी भांगडिया जयंती निमित्त रंग भरण स्पर्धा ५ डिसे. २०१६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरातील शाळांच्या ९०० वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांचे कार्य येणाऱ्या पिढीला माहित व्हावे तसेच त्यांचे स्मरण व्हावे म्हणून ही स्पर्धा ९ वर्षांपासून घेण्यात येत असल्याची भावना डॉ. एस. एम. लोया यांनी शुभेच्छापर मनोगतात व्यक्त केली. मंचावर नंदकिशोरजी बाहेती, प्रा. एल. एच. काळे, मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, पर्यवेक्षक पंजाब खडसे, सुरेश रणखांबे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आर. डी. कटारे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले तर आभार फुलसिंग गावित यांनी केले. स्पर्धेसाठी अतुल पाटील, काशिनाथ पल्लेवाड, सच्चीदानंद डाखोरे, विजय धापसे, गजानन मुळी, सुनील मोरे, पांडुरंग  पाटणकर, कविता अंबोरे, सुषमा मुळी, स्वप्नीता ढवळे, हर्षल राणा, रोहिदास चव्हाण, रामपूरकर, विलास अवचार यांनी पुढाकार घेतला.

दि. ५ डिसे. २०१६
चंपाषष्टी, दलितमित्र श्रीरामजी भांगडीया यांचा स्मृतिदिन.....अभिवादन करताना नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायनजी लोया, सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी,श्री नंदकिशोरजी बाहेती, श्री भूपेंद्र राणा, मुख्याध्यापक नरेंद पाटील, सौ चाटे,सौ पांडे,श्री काळे व संस्था कर्मचारी