Website Inauguration

संकेत स्थळाचे उद्घाटन

नूतन विद्यालय शिक्षण संस्था आपले अमृत महोत्सव साजरे करीत आहे. काळानुरूप संस्थेने आवश्यक बदल सुद्धा केले. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आजी-माजी विद्यार्थी, नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी व काळाची गरज ओळखून संस्थेने आपले संकेत स्थळ (website) तयार केले.

या संकेत स्थळाचे उद्घाटन दि. ०१ मे २०१४ (महाराष्ट्र दिन) रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक, शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संकेत स्थळाचे उद्घाटन संस्थेचे माजी विद्यार्थी श्री. अजीज अली खान यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस .एम . लोया, चिटणीस श्री . डी. आर. कुलकर्णी, सहचिटणीस डॉ. व्ही. के. कोठेकर यांनी संस्थेच्या वाटचाली बद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील तोडकर यांनी केले. नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन. एम. देशपांडे, श्री मखमले आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.