शालेय उपक्रम
शिष्यवृत्ती प्रकल्प :
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी साठी शाळेत जादा वर्ग घेतले जातात. सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात शाळेतील दोन विद्यार्थी धारक झाले आहेत.
१. अपूर्व कुलकर्णी
२. आदित्य श्रीकिशन कोल्हे
वृक्षारोपण व संवर्धन :
शाळेत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनासाठी शाळेतील वृक्षाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला गेला.
वाढदिवस शुभेच्छा :
शाळेतील विद्यार्थ्यांचा वाढदिवसाच्या दिवशी शाळेत फलकावर नाव लिहिले जाते व प्रार्थनेच्या वेळी त्यांचे शुभेच्या कार्ड देऊन अभिनंदन केले जाते.
प्रमुख :- श्री. भुमरे एस.बी.
सुविचार वाचन व लेखन :
दररोज फलकावर सुविचार लेखन केले जाते व प्रार्थनेच्या वेळी त्याचे वाचन केले जाते व त्याचा अर्थ सांगितला जातो.
बालसभा :
आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी/ चौथीतील विद्यार्थ्यांचे बालसभा मंडळ स्थापन केले जाते. यामध्ये विद्यार्थांचा सभाधीटपणा, कार्यक्रमाचे नियोजन, वक्तृत्व ह्या गुणांचा विकास केला जातो. बाल सभेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व संचलन केले जाते.
मार्गदर्शक शिक्षक :
१. सौ.देशपांडे आर. आर. २. सौ.कुंभार आर.डी.