News

गीत गायन स्पर्धा 2017नूतनच्या वरद दलाल याचे सुयश

राज्यस्तरीय वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत नूतन विद्यालयातील वरद दलाल याचे सुयश

स्वा. सै. नागोरावजी सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महात्मा ज्योतिबा फुले माध्य-उच्च माध्य विद्यालय कळमनुरी जि. हिंगोली येथे दि 9 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत चि वरद विवेक दलाल या 7 वा 'क' वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ब गटातून (वर्ग 5 वी ते 8 वी) द्वितीय क्रमांक प्राप्त करून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व 1500/- रोख बक्षीसाचा मानकरी ठरला आहे.
या स्पर्धेसाठी परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अकोला, अमरावती, बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते , या स्पर्धेत एकूण 64 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. वरद याने 'पापाची वासना नको दावू डोळा' ही संत तुकाराम महाराजांची अभंग रचना भक्तीगीत या गायन प्रकारात सादर केली. या गीतासाठी त्याला उत्तम साथसंगत लाभली ती अभिजित गजमल या विद्यार्थ्याची. स्पर्धेसाठी वरद यास नूतन विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री सच्चिदानंद डाखोरे यांनी मार्गदर्शन केले.
वरदच्या या घवघवीत यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व तसेच सर्व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले आहे